जनतेज न्युज

ईडी सारख्या संस्थेचा राजकीय पद्धतीने वापर करणे अयोग्य – रोहित पवार

प्रतिनिधी , नाशिक : आमदार रोहित पवार हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक प्रशांची उत्तरे दिली. एकनाथ खडसे यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीबाबत त्यांनी भाष्य केले आहे. ईडीच्या नोटीसीवर बोलताना रोहित पवार यांनी, ईडीसारख्या संस्थेचा राजकीय फायद्यासाठी वापर करणं चुकीचं असल्याचं मत मांडले आहे.
याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलताना त्यांनी, ‘कोल्हापूरकर त्यांचं स्वागत करतील बघू, असं वक्तव्य केले आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा पाहून पत्रकारांनी त्यांना त्यासंदर्भात देखील विचारणा केली त्यावर बोलताना त्यांनी, मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मात्र, कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली असे मत व्यक्त केले.