प्रतिनिधी , नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशीमध्ये तरुणीवर अत्याचार करून तिला लोकलमधून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना वाशीच्या खाडी पुलाजवळ घडली आहे.यानंतर तात्काळ पोलिसांनी हालचाल करत पिढीतेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.सुदैवाने आता पिढीतेची प्रकृती स्थिर आहे.
मात्र,या प्रकरणात वाशी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.ही घटना मंगळवारी घडल्याचे बोलले जात आहे.ही पिढीत तरुणी मंगळवारी रुळावर जखमी अवस्थेत आढळून आल्याने ही खळबळजनक घटना उघडकीस आली.
सदर पिढीत तरुणीही गरीब कुटुंबातील असून शनिवारी ती टिटवाळ्या तिच्या आई-बाबांकडे गेली होती.यानंतर ती नवी मुंबईत आली आणि एका मोटारमनला जखमी स्वरूपात आढळली.यानंतर या मोटरमनने पोलिसांना हा घडलेला प्रकार सांगितला आणि आता पोलीस पुढील तपास करत आहेत.मात्र,पिढीत तरुणीची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
