जनतेज न्युज

मर्चंट बँक प्रशासकांच्या गैरव्यवहारा विरोधात प्रहार संघटना आक्रमक.

प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे असलेल्या शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत, बँक प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातमिळवणी मुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे. कमी शेती असलेल्यांना देखील आर्थिक लोभापायी जास्तीचे लोन दिले जात असल्याचं आंदोलन कर्त्यांमार्फत सांगण्यात आलं आहे. या सर्व प्रकारांमध्ये बँकेचे अधिकारी व कर्मचारी आपले आर्थिक हित जोपासत असल्याचा आरोप प्रहार संघटनेतर्फे करण्यात आला आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी असे निवेदन वरिष्ट पातळीवर देऊन देखील कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यामध्ये वरपासून खालपर्यंत सर्व अधिकारी यामध्ये सामील असल्याची शक्यता प्रहार संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली असून याबाबत सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे आंदोलन करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्व गैरप्रकारांची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ईश्वर बोरसे तसेच प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करतांना केली आहे.