प्रतिनिधी , दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झालेली आहे. यामागे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे २०२० मधील वर्षभर माजलेले कोरोनाचे थैमान व घरात बसून अनुभवलेली टाळेबंदी. उत्साहाच्या भरात शांत होत असलेल्या कोरोना चा प्रसार ह्या वेळी अचानक वाढू शकतो याच गोष्टीला गांभीर्याने घेत उस्मानाबाद शहरात कडक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत डॉ संदीप पालवे अप्पर पोलीस अधिक्षक , उस्मानाबाद यांनी माहिती दिली.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे पोलिसांचे आवाहन
