प्रतिनिधी , मुंबई : महाराष्ट्र राज्यात १९९३ पासून महिला आयोग अस्तित्वात आलेला आहे पण मागील दहा महिन्यांपासून हे पद रिक्त आहे,ते भरण्यात यावीत यासाठी भाजपच्या वतीने राज्यसरकारकडे मागणी करण्यात आली आहे.
याचसोबत मागील वर्षभरात महिला अत्याचारात बरीच वाढ झाली आहे,यासाठी राज्यसरकारने पाऊले उचलावतील अशी आशा व्यक्त करत मुंबईत भाजप माध्यमप्रमुख विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी भाजपच्या वतीने राज्यसरकारवर टिका करण्यात आली.रोहिणी नायडू यांनी,महिला आयोग कमिटीमधील सदस्यांना अचानक कोणतीही पूर्ण कल्पना न देता काढून टाकणं ही ठाकरे सरकारची सुडबुद्धीची भूमिका असल्याचे मत मांडले आहे.
