प्रतिनिधी , सध्या बदलत्या जीवन शैलीत युझ अँड थ्रो ला मोठं महत्त्व आहे अगदी मित्र, पाहुणे भेटले की चहा हा हमखास आदरातिथ्य करण्याचं सहज माध्यम होय, पण सर्वत्र डिस्पोजल युझ अँड थ्रो कप वापरला जातो याच कपामुळे कॅंसर व अन्य अश्या धोकादायक आजार ओढवून घेत आपलं शरीरच आपण स्वत:च डिस्पोजल करत आहोत.
सध्याच्या घाईघाईच्या जीवन शैलीत कोणालाच वेळ नाही त्यामुळे मित्र असो वा पाहुणे असो बिनदिक्तपणे युझ ॲंड थ्रोच्या कपाचा वापर केला जातोय पण या कपाची निर्मिती करताना कागदी कप खराब होवू नये यासाठी फायब्रो फोबिक फिल्म लावलेली असते हि फिल्म पातळ प्लास्टिकपासून बनवलेली असते वॉटरप्रूफ म्हणून लावलेली हि फिल्म गरम चहाने वितळते यातुन एकावेळी २५ हजार मायक्रो कण वितळून चहासोबत आपल्या शरिरात जातात मीठापेक्षा लहान असल्याने आपल्याला दिसत नाही या प्लास्टिकमध्ये घातक असा पारा व कॅडमियम या दोन्ही प्रकारचे रसायने असल्याचे खडकपुरच्या आय आय टीचे प्राध्यापक सुधा गोयल व विद्यार्थी वेदप्रकाश राजन, अनुष्का सोहेल यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे दिवसभरात ३ ते ४ वेळा चहा घेणाऱ्यांच्या शरिरात ७५ हजार मायक्रो कण शरिरात जातात यामुळे पचनसंस्था प्रभावित होवून किडनी यकृत या सारख्या अवयवावर परिणाम होवून मेंदूचे आजार नैराश्य थकवा उच्च रक्तदाब यासारखे आजार ग्रासू शकतात गर्भवती महिला यांच्या आरोग्याला धोका होवू शकतो
