जनतेज न्युज

नागपूरात गुन्ह्यांच सत्र सुरुचं, दिवसाढवळ्या भरचौकात केला तरुणाचा खून

प्रतिनिधी , नागपूर : नागपुरात शहरातील गुन्हेगारीचं सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज शहरातील वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीतील बुद्ध विहाराजवळ दिवसा ढवळ्या एका २६ वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकिब अब्दूल सत्तार हे मृत तरुणाच नाव असून तो हसनबाग येथील रहिवासी असल्याचं समोर येत आहे. यात चार आरोपींचा समावेश असून लाकडी दांड्याचा तसेच १० इंच चाकूचा वापर करुन हा खून करण्यात आल्याचं पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. खूनाचं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करीत आहे.