जनतेज न्युज

३१ डिसेंबर च्या रात्री भवानी मातेचे मंदिर बंद असणार, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

प्रतिनिधी , उस्मानाबाद: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेपासुन १ जानेवारी पहाटे ५ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच तुळजापूर शहरासह जिल्ह्यात राञी ९ नंतर कोणत्याही प्रकारचे धार्मिक सन उत्सव साजरे करता येणार नाहीत. नागरीकांना बाहेर येणास प्रतिबंध असणार आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये असं आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याच आवाहन उस्माबादचे निवासी उपजिल्हाधिकारी राजकुमार स्वामी यांनी केलं आहे.