प्रतिनिधी , धुळे : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रकार रोखण्यात या सरकारला सपशेल अपयश आले आहे. याच्या निषेधार्त भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत जोरदार आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष यांच्यावर नोकरीचे आमीष दाखवून एका युवतीवर अज्ञात स्थळी नेऊन गाडीमध्ये अत्याचार व बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यावर राज्य सरकारने व पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. जर कारवाई करून अटक नाही झाली, तर भाजपा युवा मोर्चातर्फे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धुळे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
