प्रतिनिधी , धुळे: महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीतर्फे १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र अंनिस व नशा बंदी मंडळ, सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘द दारू चा नव्हे द दुधाचा” अनोखा उपक्रम करीत आंदोलन करणयात आले. या आंदोलनात ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा’ उपक्रम हाती घेण्यात आला.
या आंदोलन प्रसंगी दारूच्या बाटलीला जोडे मारून मद्यपानाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच गोड दुधाचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र अंनिस व नशा बंदी मंडळ व सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलन प्रसंगी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुरेश बि-हाडे, प्रा.रणजित शिंदे, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मि मंच, नशा बंदी मंडळाचे नवल ठाकरे, सर्वोदय मंडळाचे रमेश दाणे, चंद्रवीर ति सावळे, मधुभाऊ शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते.
