जनतेज न्युज

बलात्कार करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने महिलेची आत्महत्या

प्रतिनिधी , लातूर: अहमदपूर मधील इंदिरा नगर येथील ६० वर्षीय महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने सदर महिलेने वाकी नदीतील पाण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विरुद्ध गु.र.न. ४२२,२० कलम ३७६,३६६,३०६,३२३,५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी उज्वला दत्ता जाधव यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी किशन रेनुकादास उगाडे वय ४० वर्ष रा .इंदिरानगर याने फिर्यादीची सासु कांताबाई रावसाहेब जाधव यांच्यावर बलात्कार केला तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने, पिडीत महिलेने शहराजवळील वाकी नदीतील पाण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या गुन्हाची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पो.नी.सुनिल बिर्ला हे  करित आहेत.