प्रतिनिधी , परभणी: महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असुनही अद्याप त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडी सरकार हे कायदा व सुव्यस्था सांभाळण्यात अपयशी ठरले असुन हे सरकार तात्काळ बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा परभणी च्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
