प्रतिनिधी , बुलडाणा: शरीराला हानिकारक असलेली अवैध गावठी दारूच्या अड्यांवर जलंब पोलिसांनी धाडी टाकत चार गावठी अड्डे उद्धवस्त करून 53हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असुन नविन वर्षाचे आगमन आणि आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलंब पोलीसांची ही कारवाई महत्वाची मानल्या जात आहे..
बुलदण्यातील जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मच्छिंद्रखेड ते तरोडा रोडच्या बाजूच्या जंगलात अज्ञात व्यक्ती हातभट्टी ची दारु काढत आहे या माहितीवरुन जलंब पोलिसांनी 4 ठिकाणी सर्जीकल स्ट्राईक करुन गावठी दारुचे तळ उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत मोहफुलाचा सडवा, प्लास्टिक डबे,टिनडब्बे ,गूळ ,पाण्याचे कँन असे एकुण 53 हजार रुपयाचे साहीत्य नष्ट करण्यात केले आहे.नवीन वर्षाचे आगमण व आगामी ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जलंब पोलीसांची ही मोठी कारवाई मानल्या जात आहे.
