प्रतिनिधी , थर्टी फर्स्टच्या काउंटडाऊनला सुरवात झाली आहे कोरोनाची भीती मनात कायम असतांनाही पार्टी तो बनती है म्हणत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. मात्र याच तरुणाईवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनही सरसावले आहे.गुरुवारी थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने शहरातील प्रत्येक मुख्य चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार असून रात्री ११ नंतर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी आज सांगितले.
थर्टी फर्स्ट आणि जल्लोष हे एक समीकरण झाले आहे.सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शहरातील हॉटेल, ढाबाचालकांनी खवय्यांना वेगवेगळ्या ऑफर्सही देऊ केल्या आहेत. या दिवशी मद्यसेवनाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई देखील केली जाते. यंदाही शहरात वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात मोहीम राबवली जाणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदीचे आदेश
