जनतेज न्युज

शरद पवार यांचा संविधानिक विषयावर विश्वास राहिलेला नाही,महविकास आघाडीतील आमदार असंतृष्ट- मुकेश थानथराटे

प्रतिनिधी , भंडारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच केंद्रात मंत्री म्हणून काम केले आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडण्याचा भाजप प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी केलेले वक्तव्य यावरून पवार यांचा संवैधनिक बाबींवर विश्वास नसल्याचे स्पष्ट करते. आघाडी सरकारच्या कारभारामुळे त्यांच्याच सरकारमधील काही आमदार नाराज असून कदाचित त्यांचा फटका सरकारला बसू शकतो. इडीचे प्रकरण हे बँकेच्या रेकॉर्डवरून पुढे आले आहे. त्याच्यात राजकारण करण्याचा कुठे प्रश्नच येत नाही,असे मत भाजप जिल्हा महामंत्री मुकेश थानथराटे यांनी मांडले आहे.