प्रतिनिधी , बीड – औरंगाबाद येथील तरुणीवर राष्ट्रवादीच्या नेत्याने बलात्कार केल्याचा आरोपावरुन, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे कारण देत, राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख यांच्या राजिनाम्याची मागणी केली होती. बीड कॉंग्रेस तर्फे या मागणी चे खंडन करण्यात आले असुन, ही मागणी साफ चुकीची असल्याचे सांगितले आहे. भाजपने हेतुपुरस्कर केलेली ही मागणी केली असुन भाजप याच राजकारण करत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस चे गेवराई शहराध्यक्ष अंकुश पाचपुते यांनी दिली आहे. तर भाजप हे सुडबुद्धीचे राजकारण करत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.
