प्रतिनिधी , औरंगाबाद- भारतीय संविधानाने अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी इतर मागसवर्गीय तसेच महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. त्याच बरोबर राजकारणातही आरक्षण दिले आहे. मात्र राजकीय आरक्षणाचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना आता पर्यंत झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरकक्षीत उमेदवार फक्त निडून येईपर्यंत असतो. एकदा का निवडून आला तर तो व्यक्ती त्या गावच्या प्रस्थापित राजकारण्यांच्या हाताचे बाहुले बनून राहत असल्याची टीका औरंगाबाद मधील शिल्लोड तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.
आरकक्षीत उमेदवाराला निर्णय घेण्याचे कुठलेच स्वातंत्र नसुन त्यांना फक्त सही करण्यापुरतं वापरलं जातं असं ग्रामस्थांच मत आहे. महिला उमेदवाराच संपुर्ण कामकाज हे तिचा नवरा बघत असल्याची टीका ही यावेळी नागरिकांनी केली.
