प्रतिनिधी , हिंगोली- अयोध्या येथील बहुचर्चित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन समारंभानंतर आता मंदिर निर्माण करायला सुरुवात होणार आहे. या भव्य मंदिराच्या उभारणीकरीता देशातील गावा-गावांतील नागरिकांचे योगदान असावे व मंदिराशी भाविकांच्या भावना जोडल्या जाव्या, याकरीता महाराष्ट्रात श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री आनंद पांडे यांनी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. येणाऱ्या मकर संक्रांती पासून महिनाभरात घरोघरी जाऊन निधी समर्पण समितीचे कार्यकर्ते निधी जमा करणार आहेत. महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी 40 लाख कुटुंबांशी निधी समर्पण समिती संपर्क करणार असल्याची माहिती आनंद पांडे यांनी यावेळी दिली.
