प्रतिनिधी , यवतमाळ : कोरोना काळात दारू दुकानांच्या वेळेत बदल झाला आहे. नवीन कोणत्याही प्रकारचे निर्देश आले नाहीत. त्यामुळे वेळेतच दारू दुकाने बंद होतील , असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मानपिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
देशी, विदेशी शॉप, बिअर बार यांना दुकाने उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ ठरवून दिली आहे. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी दुकानांची वेळ आहे. तर केवळ बिअर बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. नवीन वेळाबाबत कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाही. त्यामुळे वेळ पाळणे बंधनकारक आहे.
