आयटीआयच्या महिला प्राचार्यांचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल..
प्रतिनिधी , बुलडाणा : शेगावातील आयटीआयच्या विद्यार्थ्याला महिला प्राचार्यांनी डॉक्यूमेंट न देता शिविगाळ केलीय.त्या व्हिडिओमध्ये म्हणताय की, “आताच माझ्यासमोर जीव दे, मी तुझे डॉक्यूमेंट देत नाही, हे कॉलेज काही तुझ्या बापाच नाही, जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग ही बाई मला शिव्या देतेय!” असं म्हणून गरीब विद्यार्थ्याला शिविगाळ करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्यांचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे.
