प्रतिनिधी , मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. विजय भास्कर पाटील यांच्या तक्रारीनुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर गिरीश महाजन यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्यांनी ८ जानेवारी २०१८ च्या प्रकरणाचा गुन्हा ३ वर्षांनी माझ्यावर दाखल होत आहे. निलेश भोईटे यांच्या भानगडी आहेत. मी पोलिसांना विचारले त्यांनी सांगितले की ते हतबल आहेत आमच्यावर दबाव आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेशी माझा काही संबंध नसताना हा हास्यास्पद गुन्हा माझ्यावर नोंदवला आहे. ही बनवाबनवी आहे. मी मुंबई उच्च न्यायायात याचिका दाखल केली आहे.याची सखोल चौकशी करावी अशी मागणी मी उच्च न्यायालयात केली आहे. त्यांनी चौकशी चे आदेश दिले आहेत. उगाच काहीतरी करून टोकाची भूमिका घेऊन असे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे,अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.
