प्रतिनिधी , अमरावतीत: मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. परंतु आज सकाळ जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने अमरावती-नागपूर महामार्गवर सकाळी आठ वाजताही दाट धुके असल्याने वाहन चालकाना हेडलाईट लावूनच वाहन चालवावे लागत असल्याचं दृश्य आज पहाटे पाहायला मिळाले. परंतु वेस्टर्न डिस्टर्बंस च्या प्रभावामुळे ४.५ किमी उंचीवर वाहणारे नैरूत्य वारे आणि १.५ किमी उंचीवरुन वाहणारे आग्नेय दिशेकडून येणारे वारे यांचा संगम पश्चिम मध्य प्रदेश वर होत असल्याने पश्चिम विदर्भात कालपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. आज पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. हे वातावरण कमी जास्त फरकाने १० जाने पर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
