जनतेज न्युज

तब्बल 22 गुन्ह्यात सराईत आरोपी असलेला 22 वर्षीय अट्टल गुन्हेगार गजाआड…

प्रतिनिधी , बुलडाणा: चोरी- घरफोडीच्या औरंगाबाद, जालना, नांदेड येथे विविध पोलिस ठाण्यात तब्बल 22 गुन्हे दाखल असलेल्या जालना येथील अट्टल गुन्हेगार बुलडाणा शहर पोलिसांच्या गळाला लागल्याने त्याच्यावर आता 23 वा गुन्हा दाखल झाला आहे.22वर्षीय आरोपी दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याला बुलडाणा शहरातील तीन गुन्ह्यात अटक केली असुन 3 दिवसाचा पिसीआर मिळाला आहे.अधिक तपास बुलडाणा पोलिस करीत आहे.