प्रतिनिधी , अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि शिवसेना नेते व अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातील वाद पुन्हा शिंगेला पोचला आहे रवी राणा यांनी काही दिवसा आधी अडसूळ विरोधात इडी कार्यालयात कागदपत्रं सादर केले आहेत
की आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत जो घोटळा केलाय त्याबाबत चौकशी हावी अशी मागणी केली होती याच संधर्भात आज माजी खासदार आंनदराव अडसूळ यांनी राणा ही नौटंकी कंपनी असून ज्यावेळीला त्यांच्या अंगाशी काही गोष्टी येतात तेव्हा दुसऱ्याला कस बदनाम करता येईल हाच त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांच्या जातप्रमाणपत्राचे प्रकरण आपल्या विरुद्ध जाणार याची कल्पना त्यांना आहे तसेच निवडणूकीमध्ये जास्त प्रमाणात केलेला खर्च हा नियमबाह्य त्यामुळे आमदारकी सुद्धा धोक्यात आहे त्यामुळे खासदारकी व आमदार की जाणार या भीतीने ते चिलबिल झाले आहेत आणि राहिला प्रश्न सिटी को-ऑप बँकेत घोटळा यामध्ये मी स्वता तक्रार केली असून त्याच्या सर्व चौकशीसाठी मी समोर जाण्यास तयार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी अडसूळ यांनी दिली.
