कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी…
प्रतिनिधी , बुलडाणा : शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी राज्यासह देशभरात आज अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. जगाच्या पोशिंद्याची होत असलेली वाताहत निगरगट्ट प्रशासन व असंवेदनशील राजकीय पक्षापर्यंत पोहोचावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनेच्यावतीने दोन दिवसीय अन्नत्याग आंदोलन केला जात आहे.
गेल्या महिन्याभरापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. यामध्ये आज गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनेच्यावतीने दोन दिवसीय अन्नत्याग आंदोलन केला जात आहे. स्थानिक गांधी चौकात या आंदोलनाला सुरुवात झालेली असून उद्या शुक्रवारी सायंकाळी या उपवास आंदोलनच समारोप होणार आहे.
