जनतेज न्युज

आईवडिलांच्या खात्यात मुलाच्या पगारीचे पैसा जमा करण्याची कार्यवाही सुरू

प्रतिनिधी , लातूर : लातूर जिल्हा परिषदेने वृद्ध माता पित्यांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० % कपात करून आईवडिलांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. याबाबतीत लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याकडे ११ प्रकरणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यात माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग व पंचायत विभागातील 11 कर्मचारी आईवडीलांचा सांभाळ करत नसल्याचे आढळले. त्याबद्दल स्वतः अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सुनावणी घेतली होती, त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाले नसल्याने, ११ कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० % पगार कपात करून थेट आईवडिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची मोठी धास्ती बसली आहे.