प्रतिनिधि , मुंबई : आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध दर्शवला.महाविकास आघाडी सरकारचा समान-किमान कार्यक्रम आहे.गेल्या वर्षभरात आम्ही चांगली कामं केलेली आहेत.मात्र,विकास कामांना आम्ही प्राधान्य देतो,असे मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
