जनतेज न्युज

गांधी परिवारासह विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय-संजय राऊत

प्रतिनिधी , मुंबई : आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

यावेळी, भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षांच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय,यात गांधी परिवारसुद्धा आहे.मात्र, कितीही काहीही प्रयत्न केले तरी विरोधीपक्ष भविष्यात एकजुटीने उभा राहील.संघर्ष करेल,आज विरोधी पक्ष तुम्हाला कमजोर जरी वाटत असेल तरी सुद्धा तो अचानक फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो आणि आपली ताकद दाखवतो, असं मत खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.

भाजप नेते वारंवार राहुल गांधींविषयी करत असलेली वक्तव्यांवरही त्यांनी आपले मत मांडले.काँग्रेसच्या अध्यक्षाला किंवा नियोजित अध्यक्षाला प्रत्येकवेळेला अपशब्द वापरून बोलणं ही काय आपली संस्कृती नाही,अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.