कुंभी वाघोली येथील घटना, २ अल्पवयीन मुलांचा समावेश
प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कुंभी वाघोली या गावातील मुलांनी चंद्रज्योतिच्या बिया खाल्याने त्याची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. मुले खेळत असताना चांद्रज्योतिच्या झाडाखाली पडलेल्या बिया खाल्याने त्यांना अस्वस्थ जाणवत होतं. काही वेळातच त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. मुले अस्वस्थ दिसत असल्याने पालकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. यात १८ मुलांचा समावेश होता. दरम्यान २ मुले बेशुद्ध झालीत त्याच्यावर सद्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.सद्या या मुलांची प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. तरी त्यांना देखरेखीत ठेवण्यात आले असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.
