जनतेज न्युज

मुंबईमधील कॉ-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या रिडेवलपिंगबाबत लवकरच निर्णय घेऊ- देवेंन्द्र फडणवीस

प्रतिनिधी , मुंबई – मुंबईमध्ये ज्या कॉ ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी आहेत यांचा सेल्फ रिडेवलपिंगचा प्रोजेक्ट आम्ही सुरू केला होता.तेव्हा चार सोसायटी डेव्हलप झाल्या. मात्र, नंतर नाबार्डने डेव्हलप करत असताना मध्येच हे प्रोजेक्ट थांबवलं. मुंबई बँकेने या प्रकल्पाबद्दल नाबार्डला सांगितले, पण नाबार्डने आरबीआय चेअरमनची परवानगी घेण्यास सांगितले.

त्यामुळे या अगोदर आम्ही नाबार्ड चेअरमनची व आता आरबीआय चेअरमनची भेट घेत आहोत. डेव्हलपरला आम्ही पैसे द्या असं सांगत नाहीये. आम्ही मेंम्बर्स ना कर्ज द्या म्हटलं आहे, त्यामुळे आरबीआयची परवानगी हवी. ती मिळावी यासाठी आम्ही आज निवेदन दिले आहेत. या सेल्फ रिडेवलपिंगच्या प्रोजेक्टमधून 16 हजार सोसायटी डेव्हलप होतील, चेअरमन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस यांनी सांगितले.