कोरोना लसीकारणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा-राजेश टोपे
प्रतिनिधी , कोरोना लसीकरणासाठी लागणार खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडे केल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय, शिवाय एका राज्यात एकाच कंपनी च्या लसीकरनाला मान्यता द्यावी अशी मागणी देखील केंद्रीय आरोग्यममंत्र्यांकडे केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. लसीकरणासाठीचा कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्राने द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय,
दरम्यान पहिल्या टप्यातील लसीकरनाच्या पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय
राज्यात चार जिल्हे वगळून ड्राय रन होणार असून शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य विभाग पोलीस प्रशासन याच्या समन्वयाच्या त्रुटी समजून येतील शिवाय को विन अँप संदर्भातील तपासणी देखील यावेळी होईल ज्यातून प्रत्यक्ष लसीकरणावेळेस कुठला अडथळा येणार नाही याची काळजी घेण्यास मदत होणार .
