प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी चार ठिकाणी ड्राय रन मोहिम राबविण्यात आली, यात अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पस व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तसेच ग्रामीण भागातील तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ड्राय रन प्रक्रिया पार पडली,अमरावती जिल्ह्यातील 100 आरोग्य कर्मचाऱ्यांनी ड्राय रन मध्ये सहभाग नोंदविला,कोरोना लस उपलब्ध जरी झाली नसली तरी कोरोना लस आल्यानंतर ही लस कश्या प्रकारे देण्यात येणार आहे त्याची रंगीत तालीम आज अमरावती जिल्ह्याच्या तिवसा ग्रामीण रुग्णालयात यशस्वी रित्या पार पडली,यावेळी रुग्णालयातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
