प्रतिनिधी , धुळे; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत धुळे जिल्हा आरोग्य विभागातर्फे संपूर्ण धुळे जिल्हाभरातील हृदय रोगाने त्रासलेल्या तब्बल 30 बालकांना तपासणी व उपचारासाठी नाशिक, इगतपुरी येथील एस एम बी टी महाविद्यालय येथे ॲम्बुलन्स द्वारे पाठविण्यात आले आहे.
या सर्व बालकांचा हृदय रोगाशी संबंधित तपासण्या व उपचाराचा खर्च त्याचबरोबर त्यांच्या घरापासून निघण्या पासून ते उपचार पूर्ण होईपर्यंतचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे. या 30 बालकांपैकी 24 बालक हे शिरपूर येथील असून 6 बालक धुळे जिल्ह्यातील इतरत्र ग्रामीण भागातले आहे.
पालकांसोबत घरातील एक व्यक्ति उपचारासाठी व मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. धुळे जिल्हा रुग्णालया तर्फे एक ॲम्बुलन्स देखील विद्यार्थ्यांच्या सोबत पाठविण्यात आली असून या ॲम्बुलन्स ला मार्गस्थ होण्यापूर्वी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी हिरवा कंदील दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
उपचार सुरू असताना बालकांच्या सोबत असलेले पालक यांचीदेखील राहण्याची व जेवणाची पूर्ण व्यवस्था शासनातर्फे केले जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
