प्रतिनिधी , भंडारा- आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्व विदर्भात आले आहेत.आज ते भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा विदर्भातील दुसरा दौरा आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
याचसोबत गोसीखुर्द प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
