प्रतिनिधी , जळगाव : रेझिंग डे उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील तीन पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे.
शिरपूर शहर पोलिस ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमात डीवायएसपी अनिल माने, शहर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सांगवीचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील, थाळनेरचे सहायक निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक किरण बाऱ्हे उपस्थित होते. मंगळसूत्र व इतर सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल, 17 दुचाकी आदी लाखो रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.
