जनतेज न्युज

करोना काळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नायलाॅन धाग्यांच्या खाली लपवून आणले होते १ कोटी रुपयांचे दमणचे मद्य…

दमण ते गुजरात वाया महाराष्ट्र दमण दारुची केली जात होती मद्याची तस्करी…
प्रतिनिधी , राज्यात मद्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स आहे त्यातच करोना काळात सुरुवातीला काही महिने मद्य व्यावसायिकांना काही काळ मोठे नुकसान सहन करावे लागले होते… त्यात अजूनही म्हणावी तशी वाहकूत सुरळित न झाल्याने मद्य विक्री व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय म्हणुन आणि जादा नफा मिळवण्यासाठी दमणचे टॅक्सी फ्रि मद्याची मोठ्या प्रमाणात देशभर तस्करी केली जाते… अशाच तब्बल जवळपास १ कोटी रुपयांच्या दमणच्या मद्याची एका मोठ्या टेम्पोतून तस्करी केली जात होती… याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरीष्ठ अधिकारी अनिल राठोड यांना मिळाली होती… त्यानुसार त्यांनी सापळा रचून दमण येथून आलेल्या एका ट्रकला पाठलाग करुन कसारा रोडवर पकडले… सुरुवातीला आपली माहिती चुकीची होती की काय? असा धक्का अनिल राठोड आणि त्यांच्या टीमला बसला कारण माहिती मिळाल्या नुसार ज्या ट्रकला अडवून त्याची झडती सुरु होती त्या ट्रक मध्ये नायलाॅनच्या धाग्यांच्या गोण्या होत्या… पण त्या गोण्या काढून पाहिल्यावर त्या गोण्यांच्या खाली जवळपास ४२५ बाॅक्स दमण मद्याचे आढळून आले… जसं जसे दारुचे बाॅक्स बाहेर काढले जात होते तसं तसे विविध प्रकारचे मद्य ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांना सापडत होते…
मिळालेल्या मुद्देमालाची अंदाजे मोजदाद ही जवळपास १ कोटी रुपयांच्या घरात जात होती…
या प्रकरणी ठाणे उत्पादन शुल्क विभागाने टेम्पोच्या ड्रायव्हरला अटक केलीये… अटक केलेला ड्रायव्हर देखील खुप हुशार असून तो अधिका-यांना चुकीची माहिती देत असल्याचे तपासात समोर आले आहे… दमणचे मद्य मध्यप्रदेश येथे घेवून जात होतो हे हे मद्य भिवंडी मार्गे घेवून गेल्यास पोलिस पकडत नाहीत असं ड्रायव्हर फिरवून फिरवून सांगत होता… पण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी तपास केला असता हे दमणचे मद्य गुजरात राज्यात जिथे मद्य विक्रीला बंदी आहे तेथे तस्करी केले जाणार होते… उत्पादन शुल्क विभागाची ही आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे … एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य जप्त करण्याची ही पहिलेच वेळ आहे…
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमप, कोकण विभागीय आयुक्त सुनिल चव्हाण, संचालिका उषा वर्मा, ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितिन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून ही कारवाई करणारे आनंद काबळे आणि त्यांच्या टीमचे राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत कौतुक केले जात आहे…