जनतेज न्युज

पॉर्न व्हिडिओच्या नादात गमावला जीव

प्रतिनिधी , नागपूर : मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारच्या पोजिशन मध्ये शाररिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉज वर घडली आहे. मृतक हा २७ वर्षीय तरुण आहे,तो इंजिनिअर असून तो सध्या बेरोजगार होता त्याच लग्न सुद्धा झालं होत आणि त्याने प्रेमिकेसोबत हा सगळा प्रकार केला , पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली ..
मृतक तरुण आणि एक २० वर्षीय तरुणी मध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध आहे. काल दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉज वरील एक खोली बुक केली होती. तिथे गेल्यानंतर दोघांनी शाररिक संबंध प्रस्तावित केले. यावेळी वेगवेगळ्या पोजिशन मध्ये शाररिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याने हात आणि पाय दोरीने बांधून घेतले ,आणि दोघांनी संबंध प्रस्थापित केले … सेक्स झाल्यानंतर ती तरुणी बाथरूम मध्ये गेली असता तो तरुण खुर्ची सह खाली कोसळला,ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ती तरुणी बाथरूम च्या बाहेर आली,तो पर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली होती, त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून,घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे
पोलिसांनी प्राथमिक दृष्ट्या त्या ठिकाणी तपासणी केली असता बांधलेल्या दोरी ने गळा आवरला गेल्याने मृत्यू झाल्या चा अंदाज आहे मात्र पोलिसांनी सगळ्याच पैलू ने तपास सुरू केला . मात्र घडलेली घटना ही अगदी विचित्र प्रकारची असल्याने या घटनेची मोठी चर्चा होत आहे