जनतेज न्युज

संभाजी महाराज अमचे आराध्यदैवत .. बाळासाहेब थोरात..

प्रतिनिधी ,संभाजीनगर विषयावर चर्चा करण्याचे कारण नाही.आमच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यातच ,महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान असल्याचे आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज ठाण्यात सांगितले..स्थानिक निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. आम्हाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. परंतु त्याबरोबर भाजपाची विचार सरणी आणि कार्यपद्धती मान्य नाही.त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत त्यावेळी आम्ही महाविकास आघाडी आहेत.प्रत्येक निवडणुकीत चर्चा करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील थोरात यांनी सांगितलं आहे.थोरात हे ठाण्यातील काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट देण्यासाठी आले होते…