प्रतिनिधी , अन …. स्वछ प्रशासनच्या माध्यमातून जि प आरोग्य विभागाच्या भिंती बोलू लागल्या आहे. हे चित्र आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागच. सगळीकडे चकाचक आणि आकर्षक वारली पेंटिंग रेखाटलेल्या भिंती लक्ष आकर्षून घेत आहेत.
जिल्हा परीषदेच्या स्वच्छ प्रशासन अभियानाच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेतील तसेच इतर विभागाच्या सर्व कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना मानवी जीवनात या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे .
कोरोना महामारीच्या कालावधीत आपल्या सर्वांसह सर्व मानव जातीला स्वच्छतेचे महत्व लक्षात आले आहेत. कार्यालय हे आपलेकरिता एक घर असुन आपन आपल्या दैनंदिन जीवनातील बहुतेकवेळ कार्यालयाच्या वास्तुमध्ये घालवत असतो, त्यामुळे आपली वास्तु स्वच्छ, निर्मळ आनंददायी आणि निरोगी असने फार महत्वाचे आहे. तसेच हा स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनमानसात रुजविने व त्यांच्यात उत्साह निर्माण करणे ही आज काळाची गरज झाली आहे. अशा अभियानातून कर्मचारी व अधिकारी यांच्यात कार्यालयीन काम करण्यासाठी सकारात्मक उर्जा निर्माण होण्यासोबतच समाजहिताचे विधायक काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी श्री रणमले यांनी सांगितलं .
