प्रतिनिधि , कोल्हापुर : कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायती पैकी 386 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 47 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने उर्वरित 386 ठिकाणी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे.आज सकाळपासूनच मतदार आणि मतदान केंद्रावर गर्दी करायला सुरू केले असून जवळपास जिल्ह्यातून 7756 उमेदवार रिंगणात आहेत.
