प्रतिनिधी , पंढरपुर : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या 16 जागांसाठी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. 1 जागा बिनविरोध झालीय.
ही निवडणूक गाजतोय ती मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील संघर्षाने. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाला त्यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांनी आव्हान दिलय. धवलसिंहानी पहिलीच जागा बिनविरोध काढून चुलते विजयसीहांच्या गटाला धक्का दिलाय. गेल्या दहा दिवसांत आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी एकमेकांवर झाडण्यात आल्या. विकासाच्या मुद्द्यापेक्षा कौटुंबिक संघर्षाचीच चर्चा जास्त झालीय. आज मतदार आपला कौल चुलत्याच्या बाजूने देतात की पुतण्याला कारभारी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
