प्रतिनिधी , सोलापुर : सिध्देश्वर यात्रेतील भाकणुकीचा सोहळा आज पार पडला. यामध्ये यंदाच्या वर्षी महागाईत वाढ होणार असल्याचा कौल वासराने दिल्याची माहिती यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली. यावेळी त्यांनी आगामी वर्षात पाऊसकाळही सामान्य राहील असे सांगितले. महागाई वाढण्याचा इशारा देताना त्यांनी दावा केला की, वासराने सर्वच फळांना आणि विड्याला तोंड लावल्याने आगामी वर्षात महागाई वाढेल असे भाकित केलेय. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत हा भाकणुकीचा सोहळा पार पडला.
