प्रतिनिधि , माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात वायु प्रदूषण कमी करण्यासाठी इगतपुरी नगरपरिषद व जनसेवा प्रतिष्ठान यांच्यावतीने इगतपुरीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
सायकल रॅलीत प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, युवावर्ग बाल गोपाल, सायकलपटू यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. रॅलीला इगतपुरी नगरपरिषद येथून सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. जुन्या मुंबई आग्रा महामार्ग द्वारे, राम मंदिर, तीन लाकडी, जोगेश्वरी, ते जाखेरे कॉम्प्लेक्स येथे समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी सर्व उपस्थितांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी, वृक्ष संवर्धन, व प्लास्टिक मुक्त इगतपुरी करण्यासाठी शपथ घेतली. प्रमुख अतिथी म्हणून घोटी येथील प्रसिद्ध सायकल पटू डॉ. कैलास गायकर निलेश बोराडे आदी उपस्थित होते याप्रसंगी जनसेवा प्रतिष्ठान किरण पाटणकर, सुनील आहेर, डॉ. प्रदीप बागल, अविनाश कुलकर्णी, प्रदीप राजपूत, सतीश यादव, संजय बाठीया यांनी मनोगत व्यक्त करून नागरिकांची पर्यावरण आपली जबाबदारी याबाबत जाणीव करून दिली. तसेच दर आठवड्याला या रॅलीचे आयोजन होणार असून शहरातील नागरिकांनी यात आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे किरण फलटणकर यांनी सांगितले
रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल इगतपुरी नगर परिषद च्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड पेखळे यांनी आभार मानले. सायकल रॅली यशस्वीतेसाठी जनसेवा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व इगतपुरी नगर परिषदेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
