हि घटना दि १३ जानेवारी रोजी रात्री १०:३० च्या दरम्यान घडली होती
प्रतिनिधि , बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील सुशिला विश्वास राठोड हिला वडीगोद्री येथील डाव्या कालव्यात टाकले मात्र तिने कसे बसे डाव्या कालव्यातून वर आली. एक महिला जखमी अवस्थेत कालव्यातून बाहेर आल्याची माहिती नागरिकांना कळताच नागरीकांनी घटनास्थळी जाऊन तिला वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणून तिच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ सुशील जावळे यांनी केले तिच्यावर प्राथमिक उपचार केले . सदर महिलेच्या गळ्याला कमरेला, तोंडावर व पाठीवर चाकूचे वार होते ती गंभीररीत्या जखमी झाली होती.यावेळी तिला विचारले असता तिने सांगितले की मी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील सुशिला विश्वास राठोड असे माझे नाव आहे. माझे लिलाबाई अंकुश राठोड, अंकुश राठोड दूनगाव तांडा यांच्याकडे पैसे होते ते पैसे देतो म्हणाले म्हणून मी आले त्यांनी मला मारहाण लिलाबाई अंकूश राठोड,अंकूश राठोड व त्यांचा मुलगा रवी राठोड यांनी मला मारहाण करून मोबाईल सोने व पैसे घेतले व मला पोत्यात भरून पाण्यात आणून टाकले असे त्या गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलेने सांगितले.या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक हनुमंत वारे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन सदर महिलेला औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून महिला गंभीर रित्या जखमी झाली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे करत आहे
