प्रतिनिधि , जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान आहे, खासदार रक्षाताई खडसे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाचा हक्क कोथळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर ती जाऊन बजावला आहे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे असेही नागरिकांना खासदार रक्षा खडसे यांनी आवाहन केले आहे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे त्यापैकी चार ग्रामपंचायती ती बिनविरोध झाल्या असून गेल्या 47 ग्रामपंचायतीमध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे
