जनतेज न्युज

अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन बलात्कार, गुन्हा दाखल.

प्रतिनिधी , जालना : शहरातील बालाजी नगर भागातून एका अल्पवयीन मुलीला एका आरोपीनं औरंगाबाद येथे पळवून नेले होते.या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.आरोपीनं मुलीला औरंगाबाद येथे पळवून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने औरंगाबाद शहर गाठून आरोपीच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली तसेच आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा व बाललैगिक आत्याचार कायद्या अंतर्गत देखील दाखल केला.या प्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक चौकशी करत आहेत