जनतेज न्युज

सांगली… जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे…

प्रतिनिधी , सुजित दोडके – सांगली : सांगली जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे…. सकाळी 7 : 30 वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली आहे.. तर अनेक पक्ष्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. सकाळ पासून ग्रामस्थांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे…

        सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.. आणि यातील 9  ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत… त्यामुळे 143 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडत आहे…आणि या निवडणुकीसाठी 1 हजार 508 जागांसाठी तब्बल 3 हजार 76 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत…स्थानिक पातळीवर पडणाऱ्या या निवडणुकांमध्ये पॅनेलच्या माध्यमातून लढती होत आहेत…

         तिरंगी अशा या लढती ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होत असून अत्यंत चुरशीने या निवडणुकीचा प्रचार पार पडला होता… जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 662 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आले असून 3 लाख 43 हजार 812 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत..