प्रतिनिधि , मुंबई : गेले अनेक महिने कोरोना केंद्र असलेल्या राजावाडी रुग्णालयात आज पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली.पहिली लस ही राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर याना देण्यात आली.या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी टाळयांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.राजावाडी रुग्णालयात तब्बल ४ हजार लस दाखल झाल्या आहेत. अखेर हि लस रुग्णालयत दाखल झाल्याने रुग्णालय परिसरात हि एक सकारात्मक वातावरण दिसून आले.पूर्व उपनगरात राजावाडी हे पालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय आहे. या ठिकाणी लसीकरणासाठी पाच बूथ तयार करण्यात आले आहे.तसेच प्रतिक्षालय, टोकन व्यवस्था, त्रास जाणवल्यास आवश्यक व्यवस्था, दोन आयसीयू खाट इत्यादी व्यवस्था हि सज्ज करण्यात आली आहे.प्रत्येक केंद्रावर पाच आवश्यक असलेले कर्मचारी असे मिळून पंचवीस कर्मचारी या केंद्रांवर असणार आहेत. दररोज दोन शिफ्ट मध्ये मिळून हजार लाभार्थीना लसीकरण करता येईल एवढी क्षमता सध्या राजावाडी रुग्णालयात आहे. शुक्रवारी जरी चारच हजार लस इथे आल्या असल्या तरी पन्नास हजार लस साठवून ठेवण्याची क्षमता राजावाडी रुग्णालयात आहे. आज या ठिकाणी पाचशे लाभार्थीना लस टोचली जाईल. आणि भविष्यात हि क्षमता वाढत जाणार आहे. त्यामुळे मुंबई च्या पूर्व उपनगरातील राजावाडी रुग्णालयाचा या लसीकरण मोहिमेत मोठा वाटा असणार आहे.
