जनतेज न्युज

१६८० कोटी पाणीपुरवठा योजना ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना- सुभाष देसाई

प्रतिनिधि , औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई आज शहरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये विकास कामे थांबले होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी १२ डिसेंबर रोजी शहरात येऊन १६८० कोटीच्या महत्त्वकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले. ही योजना शहरासाठी अत्यंत महत्वाची असून आजपर्यंत कोणत्याही जिल्ह्याने, कोणत्याही राज्याने अश्या योजना आणलेल्या नाही. त्यामुळे या योजनेचा शंभर टक्के लाभ प्रत्येक शहरवासीयांना होणार आहे. या योजनेमुळे प्रत्येकाच्या घरात पाणी येणार असल्याचही देसाई म्हणाले. त्यासोबतच औरंगाबाद शहर कचरामुक्त करणार असल्याची महत्वपुर्ण घोषनाही त्यांनी केली. शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलतांना ते म्हणाले की, शंभर बस चे उद्घाटन देखील झाले आहे. आमच्या सरकारने शहरासाठी अनेक विकास कामे केली असुन काही विकास कामे बाकी आहेत तीही लवकरच पूर्ण केली जातील असे पालक मंत्री सुभाष देसाई म्हणाले.