प्रतिनिधि , सीबीडी बेलापूर येथे घरच्या सेफ्टी लॉकचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून, 9 लाख 2500 रुपयांचा ऐवज पळविणारे चोरटे अखेर सीबीडी पोलिसांनी गजाआड केले आहेत.
सीबीडी सेक्टर 3 मध्ये एका घराचा सेफ्टी डोअरचा कोयंडा तोडून, 4 ऑक्टोबरला सोन्याच्या वस्तूसह 9 लाख अडीच हजार रुपयांची जबरी चोरी करण्यात आली होती त्यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या कारचा शोध घेतला,8 जानेवारीला संबधित कार ही सीबीडी सेक्टर 5 गुरुद्वारा रोड येथे उभी होती, त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून, कारचा पाठलाग केला व याप्रकरणी अंकुश उत्तम ढगे (35),युसुफ शेख (25)महारुफ नासिर शेख(22),छगन सिंग राजपूत (32) या चौघांना अटक केले असून, त्यांच्या कडून 8 लाख 29 हजार 645 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
